⭕ *सुलतानी व आसस्मानी संकटात शेतकरी होरपळल्या जात आहे..-नारायण आरू...*⭕

 


    ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )

            [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम / रिसोड ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२७ फेब्रुवारी मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील शासनाच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरी मिळतात त्यासाठी कागदपत्रे  जमा करतांना ससेपालट होते शेतकऱ्यांना कागदपत्रासाठी वारंवार चक्रा माराव्या लागतात. ही कागदपत्रे तयार करत असतांना संबंधित ग्रामपंचायतच्या माध्यमातून जेव्हा सह्या घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्या शेतकऱ्याला घरटॅक्स पावती फाडल्याशिवाय पंचायत समितीकडे फाईल पाठवल्या जाणार नाही असे सांगितले जाते ही कागदपत्रे करतांना ते दमछाक होते व सध्याच्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आसमानी व सुलतानी संकटाचा सामना करत आहे या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.शेतमालास भाव नाही. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो. त्यामुळे पैसा जवळ नाही अशातच घरटॅक्स पावती पाडणे म्हणजेच शेतकऱ्यांना जाणुनबुजून त्रास देण्याप्रमाणे आहे.करीता याबाबतचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे वतीने रिसोड तालुका प्रमुख नारायण आरु यांचे समवेत दीपक मापारी यांनी रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिनांक २६/०२/२०२४ ला दिले आहे.

Post a Comment

0 Comments