⭕ *मंगरूनाथ तालुक्यात झालेल्या गारपिटि मुळे पिकाचे आतो नात नुकसान पंचनामे करावे युवासेना तालुका प्रमुख कुष्णा मुळे पाटिल...*⭕

 


        ( मंगरूनाथ मानद प्रतिनिधि: अनंता घुगे ) 

             [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]      

⭕ अकोला / मंगरूनाथ ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि: २९फेब्रुवारी गुरुवार:- अकोला जिल्ह्य़ातील मंगरुळनाथ येथील 26 फेब्रुवारी रात्री मंगरूळनाथ तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे व तसेच काही भागात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या हरभरा, गहू, तूर, संत्रा, ज्वारी, कांदा, भाजीपाला इत्यादी पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिसकावून घेतला  यामुळे शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेला आहे  पिकांच्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी युवा सेना तालुका प्रमुख कुष्णा मुळे पाटिल  यांनी केली आहे  केंद्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे सोयाबीन इत्यादी पिकांचे भाव जमिनीवर कोसळल्यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक नुकसानीचा सामना करत आहे  सोयाबीनला भाव मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन साठउन ठेवले मात्र गेल्या 9 वर्षाअगोदर जे भाव सोयाबीनला होते ते चार हजाराचे भाव आत्ता आहेत. त्यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे अशा दुहेरी संकटातून शेतकऱ्यांना हिम्मत देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मंगरूळनाथ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी  जेणेकरून शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना मदत होईल अशी साद युवासेना तालुका प्रमुख कुष्णा मुळे पाटिल यांनी प्रशासनाला घातली अशा संकटावेळी काही गावातील तलाठी, कृषी सहाय्यक योग्य प्रमाणात सर्वे करत नाहीत  शेतकऱ्यांना उडवा-उडविची उत्तरे देतात अशा तक्रारी अनेक वेळा येतात मात्र यावेळी अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्यास संबंधित कर्मचारी यांना त्याच्या शब्दात उत्तरे देऊ कुष्णा पाटिल मुळे

Post a Comment

0 Comments