⭕ *आचार्य संत विद्यासागरजी महाराजांना विनंयाजली सभा कार्यक्रम...*⭕

 



( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड ) 

            [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम / मालेगाव  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२५ फेब्रुवारी रविवार:- वाशिम जिल्ह्यातील      मालेगांव  येथील दि २५ फेब्रुवारी रोजी जैन समाजाचे वर्तमान के वर्धमान महासंत युगदृष्टा ब्रम्हांड चे देवता तपस्वी सम्राट थोर विश्ववंदनीय संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज  यांना मालेगांव येथील सकल दिगंबर जैन समाजाकडून आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराजाना अंतरराष्ट्रीय सामुहिक  विनंयाजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जैन समाजा कडुन अर्पण करण्यात आली यावेळी सकाळी ६.३० वाजता श्री  १००८ आदिनाथ भगवंताचा अभिषेक करण्यात आला , ७.२० वाजता आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या चित्रा समोर दीप प्रज्वलन करण्यात आले  ७.३० वाजता आचार्य श्री १०८ विद्या सागरजी महाराज यांचे पुजन करण्यात आले , ८.३० वाजता विनंयाजली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विनंयाजली कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन सौ ज्योतीताई टिकाईत यांनी केले यावेळी सौ भारती ताई टिकाईत व सौ  प्रेरणा ताई गोरे यांनी आचार्य श्री विद्यासागर महाराज  मंगलाचंरन गीत गायले  यानंतर आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज यांच्यावर जीवनचरित्र  वर उजाळा दिला .हुकुमचंद कान्हेड , आशीष डहाळे , धिरज कान्हेड , राजेंद्र बांडे , सुनिल वाळले , सौ अलका गोरे , कल्पना कान्हेड तसेच जैन बांधव नी  मनोगत व्यक्त केले यानंतर नमोकार मंत्राचा जाप करण्यात आला यानंतर आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज यांची आरती करण्यात आली आणि नंतर सर्व जैन समाज बांधवा कडून असा एक निर्णय घेण्यात आला की   आपल्या सर्वांच्या सहयोगातून आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज यांची प्रतिमा स्थानी जैन मंदीर मधे स्थापन करण्याचे ठरविन्यात आले  त्या प्रतिमाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात येईल असे सांगण्यात आले   दि १८ फेब्रुवारी रोजी रविवार ला रात्री २.३० मिनिटांनी डोगरगड ( छत्तीसगड ) येथे समतापूर्वक समाधी झाली त्यामुळे भारतातील संपूर्ण जैन समाजावर शोककळा पसरली होती आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज  यांनी समतापूर्वक समाधी झाल्याची बातमी कळताच मालेगांववासीयांना मोठा धक्का बसला आहे २०२२ मध्ये आचार्य श्री १०८  विद्यासागरजी महाराजांचा शिरपुर जैन येथे चातुमार्स झाला होता त्यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी देशभरातून शिरपुर जैन येथे येत होते  आणि २०२४ चा चातुमार्स हा शिरपुर जैन येथे व्हावा अशी अपेक्षा वाशिम  जिल्ह्यातील जैन समाज बांधवाना होती .

Post a Comment

0 Comments