⭕ *शेलुबाजार येथे संत गजानन महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा...*⭕




    ( मंगरूनाथ तालुका प्रतिनिधि : अनंता घुगे ) 

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ मंगरूनाथ /शेलुबाजार (लोकतक न्युज प्रतिनिधी) दि:२४ फेब्रुवारी शनिवार:- मंगरूनाथ तालुक्यातील      शेलुबाजार येथील संत गजानन नगरीत नव्याने उभारलेल्या गजानन महाराज मंदिरात गुरुवारी संत गजानन महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.शेलुबाजार येथील प्रभाग क्र.५ मधील गजानन नगरीत नव्याने संत गजानन महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. गुरुवार दि.२२फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता सतीआई मंदिर येथून संत गजानन महाराज मूर्तीची वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर मूर्तीचे विधीवत पूजन व होमहवन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व महाआरती करण्यात आली. दुपारी १ वाजता महाप्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments