⭕ *रिसोडचे गटविकास अधिकारी प्रमोद बदरके यांची बदली करू नये अशी सामान्य जनतेची मागणी...*⭕



( वाशिम जिल्हा प्रतिनिधी :- अजय गायकवाड )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ वाशिम  / रिसोड ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०१ माचॅ शुक्रवार :- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पंचायत समितीमध्ये मनमिळाऊ असे गटविकास अधिकारी लाभले, सगळ्यांना विश्वासात घेऊन कामे करतात व कुणावरही अन्याय होऊ देत नाहीत. यासाठी मात्र ते नेहमी काळजी घेत असतात. त्याच्या स्वभावामुळे आणि कार्य शैलीमुळे हवेहवेसे झाले. याबाबत वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वाघमारे यांना स्थानिक तालुक्यातील नागरिक सुभाषराव कुटे निजामपूर, संतोष अंभोरे वरुड तोफा,प्रवीण वानखडे वरुड तोफा, भाऊराव चव्हाण मांडवा, या सामान्य नागरिकांनी याबाबतचे निवेदन दिनांक २९/२/२०२४ला दिले आहे. या बदलीमागे राजकीय लोकांचा हात असू शकतो असा सामान्य नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे अशा सुस्वभावाच्या व जनहिताची कामे लोंबकळत किंवा कोणालाही ताटकळत न ठेवण्याच्या स्वभावामुळे प्रमोदजी बदरके हे लोकांना हवे - हवेचे झालेले आहेत. त्यामुळे या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देऊन अशा चांगल्या अधिकाऱ्यांची रिसोड येथून बदली करू नये अशी सामान्य जनतेतून मागणी आहे  यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम, यांनी प्रतिसाद द्यावा अशी रास्त मागणी निवेदनाद्वारे रिसोड तालुक्यातून केली आहे.

Post a Comment

0 Comments