( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / रिसोड ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२९ जुलै सोमवार:- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद येथील अढळनगरातील रस्त्याने दुर्गंधी पसरली असून स्वतःच्या घरात जाणे सुद्धा मुश्किल झाले आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत कोणताही रस्ता घरात जाण्यासाठी चांगला नाही. जिथे नाल्या पाहिजे, तिथे नाल्या नाहीत.अढळ नगरातील वार्ड नंबर पाच मधील चिनकू राऊत,तैय्यब अली शाह, संतोष ताजने, इत्यादी वार्डातील नागरिकांच्या घराकडे रस्ताच बरोबर नसून नाल्या सुद्धा नाहीत.इतर नाल्याचे पाणी घरात जात आहे . मुलांच्या शाळेत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कायम चिखलमय रस्ता झाला आहे.डुकरांचे कळपानीं चिखलमय रस्त्यामुळे हैदोस घातला जात आहे.व दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला परिणामी तापाच्या साथीने नागरीक फणफणले आहेत.पाच नंबरच्या वार्डातील जनतेच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतचे सरपंच,सचीव जाणून -बुजून लक्ष द्यायला तयार नाहीत.सरपंचसुद्धा याच वार्डातील जनतेचने निवडूण दिले आहे,तरीपण त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत.याबबतची तक्रार दि. २९जुलै रोजी रिठद ग्रामपंचायतचे सरपंच,सचीव यांना दिली असल्याचे नागरिकांनी सांगितले.ग्रामविकास अधिकारी हे आठ दिवसाअगोदर काय समस्या आहेत. त्या जागेवर येऊन पाहतो असे फोनवर सांगितले.पण वार्डात फिरकलेच नाहीत .-संतोष ताजने सहा महिन्यांपासून याबाबत सर्व ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी,सरपंच,सदस्यांना अवगत केले.पण येऊन पाहायला कुणीही तयार नाही.शैवटी आम्ही कंटाळलो. -द्वारकाबाई चिंनकू राऊत


