*मालेगाव येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 104 व्या जयंती उत्साहात साजरी...*


  ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

  वाशिम / मालेगाव  ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०३ ऑगस्ट शनिवार:' वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 104 व्या जयंती निमित्त भव्य अशी मिरवणूक ढोल- ताश्याच्या गजरात काढण्यात आली.त्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर सुशोभीत सजावट त्या मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र  घोडे विशेष आकर्षण, मिरवणूक लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र गांधीनगर येथून सुरुवात, वीर लहुजी वस्ताद साळवे पुतळा, शिव चौक, गांधी चौक, दुर्गा चौक येथे कार्यक्रमाची सांगता केली.तसेच मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष -संतोष पांढरे, उपाध्यक्ष -रिषभ बाजड, प्रकाश गायकवाड, रवी जाधव,गणेश मानमोठे, भारत तायडे, संतोष बाजड, कृष्णा गायकवाड, संजय गायकवाड, शिवकुमार दाभाडे सुखदेव बाजड,रोहित गायकवाड, अजय गायकवाड, आकाश गायकवाड, मनोज गायकवाड, शिवा पारसकर संतोष साठे,समाधान नितनवरे, शालिकराम  गायकवाड, सतीश देवकते,करण शिंदे,संतोष हिवराळे, अर्जुन धबडघाव,सदाशिव गायकवाड,सोनु जाधव,उमेश गायकवाड, राजु पांढरे,विशाल वानखडे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन...रिषभ बाजड यांनी केले तर आभार व्यक्त अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष संतोष पांढरे यांनी केले.मिरवणुकीमध्ये लहान मुले, महिला -पुरुष यांची हजारो च्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments