*मालेगांव 132 के .व्ही उपकेंद्रातुन ४ लाखाच्या विद्युत ताराची चोरी...*

 ( प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड ) 

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

 वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक: ०९ शुक्रवार:- वाशिम जिल्ह्यातील मेहकर रोडवरील इलेक्ट्रीक पावर हाऊस ( 132 के व्ही ) मधुन सुमारे 4 लाख 19 हजार 400 रुपयाची तार चोरीला गेल्याची फिर्याद उपकार्यकारी अभियंता उपकेंद्रप्रमुख मालेगांव यांनी 8 ऑगस्ट रोजी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली .आनंद सुभाषजी कट्टा व 38 वर्षे व्यवसाय उपकार्यकारी अभियंता उपकेंद्र प्रमुख मालेगाव यांनी 8 ऑगस्ट रोजी मालेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी 15 . 6 . 2022 रोजी 132 केव्ही उपकेंद्र मालेगावच्या यार्डात  5835 किलोग्रॅम विद्युत तार ठेवला होता. या मालाची 27 .2 .2024 रोजी पाहणी केली असता यार्ड मध्ये असलेला विद्युत तार हा कमी असल्याचे दिसून आले . त्यामुळे त्या ठिकाणी चोरी झाल्याचा संशय आल्याने आम्ही आमचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता विनोद हंबर्डे यांना चोरी झाल्याची बाब लक्षात आणून दिली.  यार्ड मध्ये ठेवलेल्या 5835 किलोग्रॅम विद्युत तारा पैकी किती तार चोरीला गेल्याचे समजून येत नसल्याने वरिष्ठांना माहिती देऊन मालेगाव येथील कृषी विभागातील वजन काट्यावर  उपलब्ध असलेल्या विद्युत ताराची मोजणी केली असता 1175 किलोग्रॅम त्या  विद्युत ताराचे वजन भरले . त्यावरून यार्डातील एकूण 5835 किलोग्राम पैकी 4660 कि.ग्रॅम तार चोरीला गेल्याचे दिसून आले . सदर ताराची किंमत 4 लाख 19 हजार 400 रुपये असून कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदर ताराची चोरी केल्याचे दिसून आल्याने तशी फिर्याद मालेगांव पोलीस स्टेशन ला दिली . फिर्यादीवरून मालेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध  कलम 379 भादविनुसार चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे हे ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत .

Post a Comment

0 Comments