( सोलापूर जिल्हा कार्यकारी संपादक:विनोद लोखंडे )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
सोलापूर / माळशिरस ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०६ ऑगस्ट मंगळवार:- सोलापूर जिल्ह्य़ातील माळशिरस येथील फिर्यादी माळशिरस पोलीस ठाणे गुरनं १४७ / २०२४ भादविक ३७ ९ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी यांची मोटारसायकल राहते घरासमोर लावलेली असताना दिनांक २ ९ /०३/२०२४ रोजीचे रात्री २०/३० वा . ते दिनांक ३०/०३/२०२४ रोजीचे पहाटे ५:०० वा . चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे . वगैरे मजकुरची फिर्याद दिल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल होता . सदर गुन्हयाचा तपास करणेसाठी लागलीच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोधासाठी सुचना दिल्या व विशेष पथक नेमुन सदर गुन्हयातील मोटारसायकल व अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता गोपनीय बातमीदारांकरवी माहीती मिळाली की , सदर फिर्यादी यांची मोटार सायकल मेडद , जाधववाडी परिसरातील आरोपींनी चोरली आहे अशी माहीती मिळालेने त्यादृष्टीने शोध घेतला व आरोपीतांना ताब्यात घेतले सदर गुन्हयामध्ये अटक करण्यात आले व सदर आरोपींकडे कसून तपास केला असता सदर आरोपीने गुन्हयाची कबुली दिली. असुन त्यांचेकडुन गुन्हयातील केलेला.माल एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे . माळशिरस पोलीस ठाणे गुरन १४८/२०२४ भादविक ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपीने माळशिरस , पुणे , म्हसवड , फलटन , पाटस , शिंगणापुर , माळशिरस येथुन मोटारसायकल चोरी केलेल्या गुन्हयाची कबुली दिली आहे . सदर आरोपीकडुन एकुण अंदाजे २,८०,००० / रु किमतीच्या १४ वेगवेगळया कंपनीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत . सदर आरोपीकडुन खालील १३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.सदर गुन्हयातील आरोपीविरुद्ध माळशिरस पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणेस गंभीर गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे . सदरची कामगीरी श्री.शिरीष सरदेशपांडे , पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामिण , श्री . प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सो , श्री . नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग , श्री . नारायण पवार , पोलीस निरीक्षक माळशिरस पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ / संतोष घोगरे , पोहेकॉ / संतोष बोंद्रे , पोना / दत्ता खरात , पोना / मसाजी थोरात , पोना / रुपनवर , पोकॉ / अजित कडाळे , पोका रमेश बोराटे , पोकॉ / वैभव माळी , सायबर शाखेचे युसुफ पठाण यांनी केली आहे .
