*कर्जमाफी देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा...*

 

( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

वाशिम / मालेगाव (लोकतक न्युज प्रतिनिधी ) दिनांक:०६ ऑगस्ट मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील मागील वर्षापासून शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच शेतमालाला बाजार भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दुष्काळी परिस्थितीत जीवन जगत असलेल्या सरसकट शेतकऱ्यांना तेलंगणाच्या धर्तीवर कर्जमाफी सरकारने करावी, अशी मागणी होत आहे.येत्या दोन महिन्यांत राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. सरकार लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांना मोफत विज यासह विविध योजना राबवित आहे. या योजनेसाठी सरकारकडे पैसे आहे. मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी काय? असा सवाल शेतकरी करीत आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही. पण तात्पुरती मलमपट्टी व आधार म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पाहिजेत. निसर्गाचा लहरीपणा सरकारचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेती हा तोट्याचा व्यवसाय झालेला आहे. या पायी शेतकरी कर्जबाजारी होतात. कर्जमाफीचा थोडाफार फायदा शेतकऱ्यांना होतो. कृषि पिक कर्जातून मुक्तता होते. तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. अश्याच प्रकारच्या अपेक्षा आहे.वेगवेगळ्या योजना कार्यान्वीत करून शेतकऱ्यांची बोळवण केल्यापेक्षा सरकारने कृषि पिक कर्जातून मुक्तता देण्याची गरज आहे. सरकार लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांना मोफत विज यासह CS विविध योजना राबवित आहे. या योजनेसाठी सरकारकडे पैसे आहे.कर्जमाफीची राज्यातील शेतकऱ्यांना सुध्दा राम इढोळे महाराष्ट्र क्रांतिकारी आघाड़ी होतो.सीए CS मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत काय? असा सवाल शेतकरी करीत आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही. पण तात्पुरती मलमपट्टी व आधार म्हणून शेतकऱ्यांना  कर्जमाफी द्यायला पाहिजेत, शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेती हा तोट्याचा व्यवसाय झालेला आहे. या पायी शेतकरी कर्जबाजारी होतात. कर्जमाफीचा थोडाफार फायदा शेतकऱ्यांना सीए कृषि पिक कर्जातून मुक्तता होते. सरकारने मोठ मोठ्या उद्योगपतींचे अरबो रूपये कर्ज माफ केले आहे. जगाचा पोशिंदा आजघडीला कर्जपायी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवित आहे. बळीराजाला आर्थिक संकट व चिंता मुक्त करावयाचे असेल तर सरकारने पिक कर्ज माफी करून दिलासा देण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

0 Comments