⭕ *अमळनेर मतदारसंघात महायुतीचाच झेंडा फडकविणार...*🔘 ⭕ *मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार...*🔘



   ( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक: १७ ऑक्टोबर गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अमळनेर विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकविनार असा निर्धार मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत महायुती चे घटक,पक्ष असलेल्या भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय राजपूत, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पवार, शहराध्यक्ष संजय पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटिक यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा लावण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. महायुतीच्या विजयासाठी व्यूहरचना काय असावी याबाबत सर्वांची मते जाणून घेण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करू तसेच सर्व कार्यकर्त्यांना क्रियाशील करत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत केलेल्या विकास कामाची गंगा पोहोचून विजयाची माळ आपल्या महायुतीच्याच उमेदवाराच्या गळ्यात कशी पडेल..? यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही सर्वानी मनोगतातून व्यक्त केली.महायुतीचे मजबुत संघटन हीच आपली ताकद- मंत्री अनिल पाटील अमळनेर मतदारसंघात महायुतीचे मजबुत संघटन असल्याने प्रमुख तिन्ही संघटना व इतर सहकारी पक्ष संघटनेचे सर्व कार्यकर्ते हीच आपली ताकद असून या ताकदी समोर विरोधकांचा टिकाव लागणार नाही, केवळ मतदान होईस्तोवर दिलेली जबाबदारी प्रत्येकाने काळजीपूर्वक सांभाळा कोणत्याही परिस्थितीत विजय आपला निश्चित आहे अश्या भावना मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शीतल देशमुख, ऍड.व्ही.आर आप्पा पाटील, श्रीनिवास मोरे, संदीप पाटील, उमेश वाल्हे, प्रकाश पाटील, कैलास पाटील, महेंद्र पाटील तसेच राष्ट्रवादीचे विनोद कदम, शिवाजी पाटील, राजेश पाटील, गिरीश पाटील, विवेक पाटील, रामकृष्ण पाटील, सुरेश पाटील, समाधान धनगर, प्रवीण पाटील, भूषण भदाणे, बाळू पाटील, पंकज साळी, गौरव पाटील, इम्रान खाटिक, दिनेश शेतकरी, सनी गायकवाड, अभिषेक धमाल, गिरीश उदयवाल, सुशील पवार, प्रीतम पाटील, शुभम बोरसे, तारकेश्वर गांगुर्डे, सुनील पवार यांच्या सह आजी-माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

========================================

========================================
========================================
========================================
========================================



========================================

========================================
========================================

=======================================


=======================================
========================================
========================================



Post a Comment

0 Comments