( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०३ डिसेंबर मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि.30.11.2024 रोजी नर्सरी ते दुसरी वर्गातील बालगोपालांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.'मला काय व्हायचे आहे' या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी शिक्षक, डॉक्टर, नर्स, सैनिक, वैज्ञानिक, पोलीस, शेतकरी, राजकारणी, इंजिनिअर इत्यादी अनेक अशा विविध वेशभूषेत पुढे काय बनायचं आहे हे दाखवून दिले.स्पर्धे वेळी शाळेचे प्राचार्य श्री. नीरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेवेळी जज म्हणून मुस्कान धिंगरे, गणेश सातपुते यांनी काम पहिले. एकूण 55 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तसेच पुर्वप्राथमिक विभागातील श्रीमती ज्योस्ना भामरे, कुमारी रूपाली चव्हाण, श्रीमती कोमल सोनवणे , श्रीमती अनिता पाटील , श्रीमती चैताली महाजन तसेच इतर शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्रीमती देवयानी पाटील यांनी सांभाळले. कार्यक्रम यशस्वीरित्या अतिउत्साहात पार पडला.
========================================

