⭕ *पंचायत समिती हॉल अमळनेर येथील राष्ट्रीय ग्राहक दिनी आयोजित कार्यक्रम मध्ये व्यासपीठावर बोलताना..:- संतोष पाटील*🔘




( अमळनेर शहर मानद प्रतिनिधी : संतोष पाटील )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२४ डिसेंबर मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील आज रोज दि:२४ डिसेंबर मंगळवार रोजी अमळनेर येथील ग्राहक दिनी पंचायत समिती हॉल येथे बोलताना भारत जागृत मंच अध्यक्ष:संतोष पाटील अमळनेर तालुक्यातील अनेक जबाबदार व्यक्तींनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आपली पाठ फिरवली खरोखर ग्राहक देवो भव हे तंतोतंत वडिलोपार्जित पासून ते शेवट बिंदू जोशी यांनी 1972 ला सुरू केलेली ग्राहक दिन म्हटलं जातं तरीदेखील अशा ग्राहक दिवसी प्रत्येक डिपार्टमेंट मधील अधिकाऱ्यांनी आपले हजेरी लावणं अत्यंत गरजेचे असताना देखील कुठलाही मॉल वाला कुठलाही ठोक व्यापारी शहरातले तालुक्यातले कुठलाही जबाबदार होलसेल शासकीय निमशासकीय. भारत गॅस अथवा भरपूर एजन्सी असताना देखील सोबत सर्व पेट्रोल पंप सहित इंडियन ऑइल पेट्रोल पंप यापैकी जे रात्रंदिवस ग्राहकांच्या जीवनावरती आपलं अधिराज्य गाजवतात अशा सर्वांना ग्राहक देवो भव म्हणून घेणाऱ्यांना आज विसर पडला त्यात शासकीय लोकांनी सुद्धा आपला काम चुकारपणा केला. पुरवठा अधिकारी शेख मॅडम तसेच राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सर्व मान्यवर असताना अनिलजी देशमुख डॉ अविनाशजी जोशी, एडवोकेट दादासाहेब हेमंत भांडारकर, पत्रकार तसेच अखिल ग्राहक पंचायत सदस्य जयवंत वानखेडे, शुक्ला साहेब, चंद्रात्रे मॅडम, माळी सर.. एडवोकेट कुंदन महाजन.. अग्रवाल मॅडम, ग्रामीण क्षेत्रातील  अनेक अनेक रेशन दुकानदार तसेच मान्यवर मंडळी या सर्वांच्या समक्ष व्यासपीठावरून भारत जागृत मंच अध्यक्ष श्री संतोष पाटील यांनी पहावे आपणासी आपण अश्या आपल्या भाषणाच्या शैलीत ग्राहकांना योग्य तो मानसन्मान देण्यात यावा आणि गोरगरीब ग्राहकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावं अशा काही मार्मिक शब्दात आपली बाजू थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करून सर्व शासकीय तसेच ज्या ज्या ठिकाणी ग्राहक हे नाव येतं किंवा त्यांच्यावर चालणारा व्यवहार असे सर्व जबाबदार व्यक्तींना अनमोल सल्ला देण्यात आला. तसेच पुरवठा अधिकारी शेख मॅडम यांच्या क्षेत्रात येणारी शासकीय अन्न पुरवठा सेवा या ठिकाणी संपूर्ण तालुका आम जनतेकडून केवायसी च्या नावाखाली पैसा लाटण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे, तसेच बऱ्यापैकी काही रेशन दुकानदार यांच्याकडून  मेहनताना देखील वसूल केला जात आहे, असे देखील अमळनेर पुरवठा अधिकारी यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आज राष्ट्रीय ग्राहक दिनी व्यासपीठावरून संतोष पाटील भारत जागृत मंच अध्यक्ष यांनी अनेक बाबतीत खुलासा करून दिलेला असून या पुढील सर्व गोष्टींच्या बाजू विचारात घेऊन सर्वसामान्य ग्राहकांना न्याय देण्यात येईल असे हजर असलेले काही शासकीय तसेच पुरवठा डिपारमेंट मधील जबाबदार अधिकारी तसेच राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने सर्व तालुक्यातील ग्राहकांना योग्य तो न्याय दिला जाईल कार्यक्रम सूत्रसंचालन रेशनिंग संघटना अध्यक्ष प्रवीण भाऊ गोसावी यांनी पार पाडले असून त्यांनी सर्व ग्राहकांचे मनोभावे सगळ्यांना पुष्पगुच्छ हार देऊन ग्राहक दिनाची जनजागृती केली...


========================================


Post a Comment

0 Comments