⭕ *शांतीनिकेतन शाळेत पो नि विकास देवरे यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन...!*🔘



  ( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०२ जानेवारी गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील  शांतिनिकेतन प्राथमिक विद्यालयात शालेय क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन अमळनेरचे पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन केले.

     उद्घाटनप्रसंगी देवरे  साहेब म्हणाले की,विविध खेळातून मनाला, बुद्धीला व शरीराला फायदा होतो. शरीर तंदुरुस्त राहते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये खेळाचे खूप महत्त्व आहे.खेळामुळे व्यक्तिमत्व विकसित होते. म्हणून बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकासही महत्त्वाचा आहे. यावेळी सेवानिवृत्ती न्यायाधीश गुलाबराव पाटील यांनी ही विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले. संस्थाअध्यक्ष नानासाहेब डी.डी पाटील यांनी संस्थेच्या चांगल्या कामगिरीबद्दल शिक्षकांची प्रशंसा केली.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नानासो डी.डी पाटील होते. प्रमुख उद्घाटक पोलीस निरीक्षक विकास देवरे , मनोरंजक खेळ उद्घाटक ,प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील होते .मंचावर संचालक नंदकुमार पाटील, प्राचार्य प्रा. डॉ.लिलाधर पाटील, शांतिनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर ,माजी मुख्याध्यापक यशवंत सूर्यवंशी सर ,संजय सोनवणे सर आदी उपस्थित होते.शाळेच्या पटांगणात कबड्डी, खो खो, लिंबू चमचा, गोणपाट स्पर्धा, संगीत खुर्ची कॅरम ,बुद्धिबळ यांसह विविध स्पर्धा व मनोरंजक खेळ घेण्यात येणार आहेत. 

      या स्पर्धांचे नियोजन व व्यवस्थापन प्रा.डॉ.शैलेश पाटील, प्रा. प्रितेश तुरणकर , एस आर जाधव सर , के बी पाटील सर  ,स्वप्निल पाटील सर आदी क्रीडा शिक्षक करणार आहेत.विभागीय स्तरावर खेळलेल्या मुले व मुली खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी जयवंत पाटील, सौ स्नेहल शिसोदे, शिवाजी मोरे, अजय भामरे, के के पाटील, राहुल पाटील, स्वप्निल पाटील, प्रदीप पाटील आदी शांतीनिकेतन शाळेचे शिक्षक उपस्थित होते. तसेच जय योगेश्वर माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

========================================

Post a Comment

0 Comments