( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०४ जानेवारी शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्रीमती मंजुषा गरुड तर प्रमुख वक्ते विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. पाटील यांनी भुषविले. श्रीमती मंजुषा गरुड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती गरुड यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या सत्यशोधक विचारांचा वारसा सुरू ठेवून सामाजिक बदल कसा करता येईल यावर भाष्य केले. तर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी आपल्या व्याख्यानात सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन समाज व संस्कृतीचा विरोध पत्करून मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमांची जाणिव करुन दिली.अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा. व्ही. डी. पाटील यांनी सावित्रीबाईंनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकीत त्यांच्या स्त्री शिक्षण व महीला उध्दाराच्या कार्याचा परिचय करून दिला.सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
========================================
