⭕ *अ‍ॅड.व्हि.डि.मोतीवाले सराना निरोप देण्याच्या हेतुने छोटेखानी निरोप समारंभ आयोजित करुन त्याना पुष्पगुच्छ व डाॅ बाबासाहेब आंबेडकर याची प्रतिमा देऊन अभिनंदन केले.व शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला...*🔘

 




   ( अमळनेर शहर प्रतिनिधी :- मधुसुदन विसावे )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०७ जानेवारी मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट.नं.2 श्रीमती एस.एस.जोंधळे मॅडम यांनी त्यांचे कोर्टात सरकारी वकील म्हणून असलेले ॲड.व्हि.डि.मोतीवाले हे सुमारे 16 महिन्यापासून कामकाज करीत आलेले असल्याने व त्यांचे जागेवर नवीन सरकारी वकील येणार असल्याने, जोंधळे मॅडमनी ॲड.मोतीवाले सराना निरोप देण्याच्या हेतूने,छोटेखानी निरोप समारंभ आयोजित करून,त्यांना पुष्पगुच्छ💐देऊन,त्यांनी त्यांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा 🪪देऊन,त्यांचे अभिनंदन करून, त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन,निरोप देण्यात आला.या प्रसंगी श्रीमती जोंधळे मॅडमनी त्यांचे व्यक्तिगत मत व्यक्त केले की,मोतीवाले सरांचा स्वभाव खूपच चांगला,प्रेमळ,मनमोकळा, स्पष्टपणा,शिस्तपणा,व वक्तशीरपणा असा असून,ते नेहमीच कोर्टामध्ये शासनाची बाजू खूपच चांगल्या प्रकारे, भक्कमपणे,निर्भयपणे व प्रामाणिकपणे मांडतात तसेच ते कामकाज करताना,कोणाचीही भिडभाड न ठेवता,ते त्यांचे म्हणणे केसेसमध्ये मांडतात व चांगल्या प्रकारे केसेस चालवतात तसेच कोर्टामध्ये त्यांचे कामकाज खूपच खेळीमेलीचे,मनमोकळी पणाने, प्रेमाने व हसतखेळत सतत राहिलेले आहे.मला त्यांची कामाची पद्धत खूपच आवडली.त्यांचा स्वभाव व वागणूक खूपच आवडला.ते सर्वांना घेऊन कामकाज करतात ते ज्येष्ठ असून सुद्धा,मला कधीही कामकाज करताना टेन्शन आले नाही.ते कोर्टात हसत खेळत वातावरण ठेवतात.त्यांना मी सतत हसऱ्या चेहऱ्याने पाहत आलेली आहे.ते खूपच अभ्यासू, हुशार,मेहनती,कष्टाळू व चांगली व्यक्ती आहे.त्यांनी त्यांचे परिवाराकडे सुध्दा खूपच चांगले व्यवस्थित लक्ष दिलेले आहे. त्यांची यापुढे सुद्धा अशीच भरभराटी व प्रगती व्हावी हेच याप्रसंगी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते व त्यांचे अभिनंदन करते.असे शेवटी जोंधळे मॅडमजी म्हणालेत.या निरोप समारंभच्याप्रसंगी ॲड.व्हि.डी.मोतीवाले सरांचा कोर्टातील स्टेनो कोठावडे मॅडम, सीनियर क्लार्क डी.एम.महाजन, चव्हाण भाऊसाहेब,शिपाई राठोड भाऊसाहेब उपस्थित राहून,त्यासर्वानी सुद्धा त्यांचे पुष्पगुच्छ💐देऊन,त्यांचे अभिनंदन करून,त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात.शेवटी मोतीवाले सरांनी सुद्धा मला सर्वांनी खूपच मनापासून  सहकार्य केले. सर्वांनी सांभाळून घेतले.माझे कडून नजरचुकीने काही चुका झाल्या असतील तर मला सर्वांनी माफ करावे व यापुढे सुध्दा असेच स्नेह कायमस्वरुपी ठेवावा तसेच मला निरोप देऊन, अभिनंदन करून,मला हार्दिक शुभेच्छा सर्वांनी दिल्याबद्दल,मी सर्वांचे मनापासून आभारी आहे.आणि मी सदरची आठवण कायमस्वरूपी माझ्या मनात ठेवील.असे शेवटी मोतीवाले सर म्हणालेत.

=========================================

Post a Comment

0 Comments