( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०१ जानेवारी बुधवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महसूल विभागाच्या पथकाने अवैद्य रित्या गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर व एका टेम्पोवर सानेनगर व रणाईचे येथे कारवाई करून दोन्ही वाहने अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.अमळनेर तालुक्यात मोठया प्रमाणात गौण खनिज वाहतूक रात्रीच्या वेळी सुरू राहते.अवैद्य गौण खनिज वाहतूकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाचे पथक रात्री गस्तीवर असतात. ह्या पथकाला रात्री रणाईचे ता.अमळनेर येथे गौण खनिज वाहतूक करतांना ट्रॅक्टर व सानेनगर तांबेपुरा येथे टेम्पो आढळून आला. पथकाने दोन्ही वाहनांवर कारवाई करून वाहने अमळनेर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व्ही.पी पाटील नगाव,पी एस पाटील वावडे,ग्राम महसूल अधिकारी ए बी सोनवणे अमळनेर, आशिष पारधे सारबेट, एम आर पाटील जैतपिर,जितेंद्र पाटील शिरसाळे,आय एस महाजन गांधली,जितेंद्र जोगी निम,अभिमन महाजन,श्री.कदम आदींच्या पथकाने केली...
========================================


