⭕ *एमपीडीए तून सुटून आलेल्या आरोपीवर सात ते आठ जणांचा हल्ला...*🔘


   ( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०३ फेब्रुवारी सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील एमपीडिए तून सुटून आलेल्या विशाल दशरथ चौधरी याला सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी ठोकल्याची घटना दुपारी बाजार समिती आवारात घडली.*

      विशाल दशरथ चौधरी हा १ रोजी एमपीडिए कारवाईतून सुटून आला आहे. त्याच्यावर दुसऱ्यांदा एमपीडिए कारवाई झाली होती. तो ३ रोजी बाजार  समितीच्या आवारात कामासाठी आला असता त्याला सात ते आठ जणांनी मारहाण केल्याने त्याच्या डोक्याला तीन ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे.दरम्यान पोलिसांना घटनेचे  सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहेत. जखमीच्या जबाबानन्तर  गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी दिली.

========================================

Post a Comment

0 Comments