⭕ *जल क्षेत्रात अती उत्कृष्ट उल्लेखनीय योगदानाबद्दल कासोद्याच्या सुपुत्राचा नवी दिल्लीत केंद्रीय जल आयोग कळून पुरस्कार देऊन सन्मानित करून गौरवीण्यात आले...*🔘



(एरंडोल तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / एरंडोल ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१७ एप्रिल गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुका कासोदा येथील आदरणीय आयु मिलिंद गुंताबाई अर्जुन पानपाटील (IES) संचालक ( Level 14)  केंद्रीय जल आयोग, जल शक्ती मंत्रालय , भारत सरकार यांची केंद्रीय जल आयोग नवी दिल्ली यांनी त्यांच्या 25 वर्षाच्या जल क्षेत्रात केलेल्या विशेष अती उत्कृष्ट  उल्लेखनीय कामगिरी आणि योगदानाबद्दल त्यांनाAward for "Outstanding Contribution and Dedication in Water Sector." याने सन्मानित करून गौरविण्यात आले.या पुरस्कारासाठी केंद्रीय जल आयोग,भारत सरकार नवी दिल्ली यांनी त्यांची निवड करुन हा पुरस्कार त्यांना 14 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय जल आयोगाच्या 80  व्या Foundation Day च्या समारंभात  डॉ मुकेश कुमार सिन्हा, अध्यक्ष  केंद्रीय जल आयोग तथा पदसिद्ध सचिव भारत सरकार नवी दिल्ली यांच्या हस्ते सन्मानित करून गौरविण्यात आले.यावेळी केंद्रीय जल आयोगाचे श्री नवीन कुमार , सदस्य  श्री भोपाल सिंह, सदस्य, हे उपस्थित होते.विशेष म्हणजे केंद्रीय जल आयोग नवी दिल्ली याची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 5 एप्रिल 1945 रोजी केली होती.हा पुरस्कार या वर्षी पासून सुरू करण्यात आला.ह्या पुरस्कारासाठी आयु मिलिंद पानपाटील यांची  संपुर्ण भारतातील केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यांमधून निवड करण्यात आलेली आहे.आयु मिलिंद पानपाटील हे VJTI मुंबई चे B Tech (Civil) असुन ते मुंबई  विद्यापीठात प्रथम होते.आयु मिलिंद पानपाटील हे भारतीय अभियांत्रिकी सेवा  2002 Batch चे अधिकारी आहेत.हा पुरस्कार विशेष म्हणजे 14 एप्रिल 2025 , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी मिळत असल्याने त्याचा खुप खुप अभिमान वाटतो.याबद्दल सन्मानाबद्दल आयु मिलिंद पानपाटील यांचे समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे .

=========================================



==========================================

=========================================
=========================================

=========================================
=========================================
========================================


Post a Comment

0 Comments