(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२२ जुन रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील खास बातमी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नीत ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड, संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा .डॉ. देवदत्त पाटील यांनी उपस्थितांना योग प्रकाराविषयी माहिती दिली. योग हे एक शास्त्र आहे. शरीर,मन आणि आत्मा एकत्रितरित्या संतुलन घडविण्याचे निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे साधन आहे असे त्यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. व्हि.डि. पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, डॉ . जितेंद्र माळी,प्रा. विजयकुमार पाटील यांनी परिश्रम घेतले.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते...
=========================================

