⭕ *जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगरपरिषद कडून वृक्ष लागवड...*🔘



(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०६ जुन शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी अमळनेर नगरपरिषद मार्फत शहरात वृक्षलागवड मोहिम राबविण्यात आली.   अमळनेर शहरातील गणेश कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, स्वामी विवेकानंद शाळा, शाह नूर शहा दर्गा परिसर इत्यादी विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले . या विशेष मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी, ५ जून रोजी सकाळी ८ वाजता प्रत्येक प्रभागात मुकादम यांनी आपल्या अधिनस्त सफाई कर्मचारी व प्रभागातील नागरिक यांना सोबत घेऊन स्वच्छता व पर्यावरण शपथ घेऊन सुरुवात झाली. 

         या वर्षी "जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन" ही संकल्पना घेऊन पर्यावरण, वन व हवामान बदल महाराष्ट्र राज्य सरकारकडून ही विशेष नागरिकांकडून पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराजवळ एक वृक्ष लागवड करावे  मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नगरपरिषदेची IEC टीम शहरात प्लास्टिकमुक्तीसाठी आणि पर्यावरणपूरक पर्यायांच्या वापराबाबत जनजागृती करत आहे.नागरिक, आजी-माजी लोकप्रतिनिधी, तसेच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांना  तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर परिषद यांनी आवाहन केले आहे की उपक्रमांमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. 

         शहराच्या स्वच्छतेसाठी, निसर्गसौंदर्याच्या संवर्धनासाठी आणि हरिततेच्या दिशेने वाटचाल सुनिश्चित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहेत.सदर कार्यक्रम अंमलबजावणी प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर, उपमुख्याधिकारी  रवींद्र चव्हाण, बांधकाम अभियंता . सुनील पाटील, बांधकाम अभियंता अजित लांडे, विद्युत अभियंता कुणाल महाले, लेखापाल कृणाल कोष्टी, स्वच्छता निरीक्षक श्री किरण कंडारे, वसुली विभागातील निरीक्षक रवींद्र लांबोळे,  निरीक्षक लौकिक समशेर, मिलिंद चौधरी, प्रभाग मुकादम - सिद्धार्थ मोरे, अनिल बाविस्कर, गौतम मोरे, गौतम बिऱ्हाडे, शहर समन्वयक- गणेश गढरी, युनूस शेख, गौतम बिऱ्हाडे, श्याम करंदीकर, योगेश पवार, सतीश बिऱ्हाडे, महेंद्र बिऱ्हाडे  महिला हौसिंग ट्रस्ट चे महिला पदाधिकारी योगिता मालुसरे, वैशाली चौधरी व इतर महिला कर्मचारी, प्रभागातील नागरिक आदी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते... 

"चला, एकत्र येऊन अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवूया !" प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवड ही आपली पर्यावरण संतुलन राहण्याचे व आपला परिसर सुंदर राहण्याचे आवाहन अधिकारी अमळनेर यांनी केले आहे...

=========================================

Post a Comment

0 Comments