(बुलढाणा जिल्हा मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ बुलढाणा / लोणार ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१३ जुलै रविवार:- बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील,वेणी गाव या ठिकाणी बौद्ध समाजाने लावलेला.🇪🇺निळ्या झेंड्याला.जातीवादी समाजकंटकांनी निळ्या झेंड्याला.विरोध करून कंपाउंड उकडून फेकून दिले आहे.तात्काळ प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्रभर निळा झेंड्याचा प्रतिसाद उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो.जाणीवपूर्वक निळा झेंडा काढण्यासाठी समाजकंटकांनी जमाव केला,आणि दहशत निर्माण करायचं काम केलं.बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ बौद्ध वस्तीला संरक्षण देऊन समाजकंटकांना ताब्यात घ्यावे.
बुलढाणा जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ या घटनेची बैठक घेऊन निळा झेंडा सन्मानाने लावण्यात यावं अशी आम्ही मागणी करतो.वेणी गावाला पोलीस संरक्षण देण्याचे काम करावे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घ्यावी.दलितांना संरक्षण द्या,दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दंगल घडून आणणाऱ्यांना अटक करा अशी आम्ही मागणी करतो.!!
*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
आकाश दादा शिरसाट
==========================================





