(जळगाव/यावल मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / यावल ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०९ ऑगस्ट शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील यावल येथील आदिवासी दिनानिमित यावल किनवट येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थीत असलेले आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय महानिरीक्षक डॉ. नीरज चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आदिवासी समाज हा सर्वात पीडित असून अन्यायग्रस्त आहे . आदिवासी समाजाचा सर्वांगीण व अर्थपूर्ण विकास व्हावा यासाठी शासनाने विकास योजनांचा कृती आराखडा केला आहे. या विकास योजनांचा लाभ आदिवासी कुटुंबांना व्हावा ही शासनाची मनोमन अपेक्षा असते, परंतु आज त्याच विकास योजना पासून आदिवासी समाज कोसो दूर असल्याचे दिसून येते. याचे महत्वाचे प्रमुख कारण म्हणजे योजनांबाबत प्रशासनातही याबाबत उदासीनतेचे वातावरण काही प्रमाणात दिसून येते.
प्रकल्प कार्यालयाद्वारे योग्य पद्धतीने या योजनांची कायदेशीर माहिती ही दिली जात नाही. त्याचा प्रचार-प्रसार केला जात नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजना मिळवण्यासाठी प्रकल्प कार्यालयात एजंटशीप चा वाढलेला सुळसुळाट. यामुळे गरीब आदिवासी बांधवांच्या पदरात या योजना समसमान प्रमाणात पदरी पाडून घेण्यासाठी असमर्थ ठरतो. या आज आदिवासी समाजाच्या विकासासाठी जवळपास २०० ते ३०० योजना आहेत परंतु त्या योजनांची साधी कल्पना देखील आपल्या बांधवांना नसते. म्हणूनच आज समाजाची अशी दयनीय अवस्था झाली आहे. दुसरी गोष्ट विकास योजना राबविण्याच्या बाबतीत प्रशासनाची उदासीनता अधिक प्रमाणात जाणवते. त्यामुळे ही विकास योजनांचा लाभ त्यांना मिळू शकत नाही. शिवाय विकास योजना राबविण्याच्या बाबतीत अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि हे एजंट चे मिळून एक जाळे तयार झाले असल्यामुळे आदिवासी समाजाचा विकास होत नाही. आणि त्यामुळेच या प्रकल्प कार्यालयात असणारे एजंट आणि त्या कार्यालयातील त्यांचे सहकारी शोधून काढून त्यांच्यावर पोलिस कार्यवाही करा. तरच या विकास योजनांचा व शैक्षणिक सवलतींचा फायदा आपल्या गरजू आदिवासी बांधवांना होऊन त्यांचा सामाजिक, आर्थिक विकास शक्य आहे.
आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना करणे हेच परिषदेचे उद्दिष्ट आहे. जास्तीत जास्त तरुणांनी आपल्या सोबत येण्याचे आवाहन देखील केले. राष्ट्रीय महानिरीक्षक डॉ. नीरज चव्हाण यांचे हे आवाहन आदिवासी समुदायाच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्यास आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यास मदत होईल.यावेळी शाखा उद्घाटन कार्यक्रमाला आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजू तडवी, युवा महानिरीक्षक रौनक तडवी, जळगाव जिल्हा अध्यक्ष मुराद तडवी, संघटक मुनीर तडवी, अनिस तडवी आदी पदाधिकारी उपस्थित होते...
=========================================
