(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:20 ऑगस्ट बुधवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील दिनांक २० ऑगस्ट रोजी ११.४५ ते १३.३० वाजे दरम्यान अमळनेर शहरात वाणी मंगल कार्यालयात प्रशासनाकडून आगामी गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने उपविभागीय अधिकारी .नितीन मुंडावरे, तहसीलदार.रूपेशकुमार सुराणा मुख्याधिकारी,तुषार नेरकर. उप अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी नेमाडे,व चौधरी प्रभारी अधिकारी, मारवड पोलिस स्टेशन जी भाऊ पाटील. यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील व मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, गणेश मंडळ पदाधिकारी, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव हजर होतेअशांची . दरम्यान गणेश भक्तांच्या व नागरिकांच्या सर्व विभागांनी अडीअडचणी जाणून घेतल्या असून त्यांची कायदेशीर रित्या पूर्तता करण्याबाबत कळविले आहे.
तसेच सर्व उपस्थितांना मा. वरिष्ठांकडून प्राप्त सूचनांप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले असून संपूर्ण गणेश उत्सवात सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व संस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत प्रांत अधिकारी नितीन मुंडकार यांनी शांतता कमिटी मध्ये नागरिकांना सुचना दिल्या गणपती उत्सव हा सर्व धर्म समभावनेचा उत्सव आहे. त्यात मुस्लिम समाजातील भावना दुखावल्या जाणार नाही याची जान ठेवुन सहकार्य करावे व असे प्रशासकीय अधिकारी व पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांनी सुचना देण्यात आले आहे...
========================================

