⭕ *बालविवाहाच्या भस्मासुराचे दहन करा -प्रांताधिकारी मुंडावरे...आधार बहुद्देशीय संस्था, मंगळग्रह सेवा संस्था व प्रशासनातर्फे जनजागृती...*🔘



(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी) 

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१३ शनिवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील बालविवाहामुळे उपस्थित होणाऱ्या विविध प्रश्नांच्या अनुशंगाने बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. मात्र तरीही छुप्या पद्धतीने किंबहुना अशिक्षितपणामुळे बालविवाह होणे सुरुच आहे. कालच भिलाली येथे बालविवाह कायदा मोडून विवाह झाल्याचे निष्पन्न झाल्याने मारवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हा प्रकार निंदनीय आहे. बालविवाह रोखण्यासाठी पुरोहितांचे योगदान महत्त्वाचेच आहे. मात्र सामाजिक जाणिव ठेवत बालविवाहाच्या या भस्मासुराचे दहन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. त्यामुळे आपण या चळवळीत झोकून द्यावे, असे आवाहन प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी केले.जागतिक बालविवाह निर्मूलन सप्ताह 'जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन' अंतर्गत आधार बहुउद्देशीय संस्था, मंगळग्रह सेवा संस्था व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ रोजी श्री मंगळग्रह मंदिर परिसरात जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव,जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रवींद्र मोरे, कार्यालय अधीक्षक भरत पाटील, हिशेबनीस मनोहर तायडे, पुरोहित संघाचे राजेंद्र निजामपूरकर, प्रफुल्ल जोशी, नंदू जहागीरदार, मंदार कुलकर्णी, आधार संस्थेचे प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मुरलीधर बिरारी, राकेश महाजन, समाधान अहिरे, वंदना पावरा, सोनाली वसावे व समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह मंगल सेवेकरी उपस्थित होते.याप्रसंगी प्रफुल्ल जोशी, मंदार कुलकर्णी, दिलीप बहिरम आणि भरत पाटील यांनीही बालविवाह थांबावेत यादृष्टीने समाज, पुरोहित संघ व प्रशासन यांनी आच भूमिका सजगतेने पार पाडण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी सर्व उपस्थितांनी बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेतली.मोहिनी धनगर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागतासह सूत्रसंचालन केले व आभार मानले.

========================================

Post a Comment

0 Comments