( अमळनेर शहर मानद प्रतिनिधी:संतोष पाटील )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०२ रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळनेर मराठी वाड.मय मंडळाची यंदाची त्रैवार्षिक निवडणुकीत काट्याच्या लढती झाल्या. त्यांत डॉ. अविनाश जोशी यांच्यासह त्यांच्या अभिजित मराठी पॅनलच्या १६ पैकी १० तर प्रतिस्पर्धी शरद सोनवणेंच्या परिवर्तन पॅनलच्या ६ जागा निवडून आल्या. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती.
अध्यक्ष पदासाठी १५२ पैकी डॉ.अविनाश जोशी हे ९० मते पटकावित निवडून आले.त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शरद सोनवणे यांना ६० मते मिळाली, ते पराभूत झाले.
डॉ. जोशींच्या पॅनलचे उपाध्यक्ष पदांचे दिग्गज उमेदवार नरेंद्र निकुंभ (६९) व श्यामकांत भदाणे (६५) यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. सोनवणेंच्या पॅनलचे डॉ.रविंद्र कुळकर्णी (७५) व विवेकानंद भांडारकर (७४) मते पटकावित विजयी झाले आहेत.
कार्यवाहच्या ३ जागांवर डॉ.जोशींचे उमेदवार प्रा.श्याम पवार (१३२) व भैय्यासाहेब मगर (१०५) मतांनी आणि प्रतिस्पर्धी पॅनलचे प्रदीप साळवी १०३ मतांनी निवडून आले आहेत.
कोषाध्यक्ष पदासाठी परिवर्तन पॅनलचे उमेदवार प्रा.डॉ. उदय देशपांडे ७६ मते घेत ईश्वर चिठ्ठीने निवडून आले आहेत.आणि सदस्य पदांसाठी डॉ.जोशींचे उमेदवार बन्सिलाल भागवत ९८ मतांनी विजयी, स्नेहा एकतारे (१०३), संदीप घोरपडे (८८), वसुंधरा लांडगे (१०७), डॉ.महेश रमण पाटील (१०३) व प्रा.डॉ.विजय तुंटे (९७) मतांनी विजयी, परिवर्तनचे ऍड. के.व्ही.कुळकर्णी (८३) मते घेत ईश्वर चिठ्ठीने निवडून आले आहेत. कांचनबेन शहा (९३) व सोमनाथ ब्रह्मे (८८) मतांनी विजयी झाले आहेत. निवडणुक अधिकारी.. आबासाहेब अमृत पाटील अर्बन बँक मॅनेजर अमळनेर, भाऊसाहेब देशमुख यांनी निकाल घोषित केले.त्यांना या कामी विजय बोरसे, दिनेश नाईक, विजय शुक्ल व कृष्णा भावसार यांनी सहाय्य केले.
==================================================
