⭕ *ग्रामविकास शिक्षण मंडळ संचालित मारवड महाविद्यालयात संविधान गौरव दिन साजरा करुन कार्यक्रम संपन्न झाला...*🔘

 



( अमळनेर तालुका/शहर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी ) 

            [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:३० नोव्हेंबर रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर  तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचालित . न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड  येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. सुरूवातीला संविधानाविषयी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ.शशिकांत पाटील यांनी सविधान दिन साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश सांगितला.

      याबरोबरच संविधानाने भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार दिले. यातून भारत देश एक मजबूत लोकशाही राष्ट्र बनला असे मत त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. किसान महाविद्यालय, पारोळा येथील प्रा. डॉ. शशिकांत पाटील तसेच प्रा. डॉ. एन.बी. शिरसाठ, मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेतील अनेक स्वयंसेवकांनी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भूषविले.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे,सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अनेक स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.

===================================================

Post a Comment

0 Comments