( अमळनेर शहर प्रतिनिधी उमाकांत एस ठाकुर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२७ फेब्रुवारी मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील तालुक्यातील ग्रामीण भागातील दहिवद या गावी अवकाळी पावसामुळे व गारपिटामुळे शेतीच्या हमीभाव मिळेल या आशाने शेतकरी ने दिनांक २६.२ .२०२४ रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी रात्री अवकाळी पावसामुळे व गार पडल्यामुळे शेतीचे भरमसाठ नुकसान झाले आहे शेतकरी ने व्यथा मांडताना सांगितले की मी एक कर्जबाजारी झालो आहे मला नातेवाईकांकडून पैसे घेऊन गहू व मका लावलेला होता मात्र माझ्या शेतीचा उत्पन्न येणारा होता. रात्रीच्या गारपिट मुळे अवकाळी पावसामुळे मक्का हा संपूर्ण झोपलेला आहे व गहू हा सुद्धा नुकसान झालेल्या परिस्थितीत दिसत आहे माझ्या गावातील कोतवाल संदीप देसले यांनी कोणतीही दखल शासनाकडे दिली नसून फार मोठे नुकसान झालेले आहे असे शेतकरी संदीप भदाणे याने शेतीचे नुकसान झालेल्या परिस्थितीत लोकतक चैनल अशी संपर्क साधत साहेब मला आपल्याकडून शासन दरबारातून मला काहीतरी मदत मिळावी माझं पिकाचे मला आर्थिक नुकसान झाल्यामुळे मला कोणीही पैसे देणार नाही माझी परिस्थिती दयनीय झाली आहे शासन दरबारात मला काहीतरी मदत मिळावी असे मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य पुनर्वसन व मदत कार्य मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दहिवद या गावी भेट देऊन शासन दरबारा कडून काहीतरी न्याय मिळवून देण्यात यावे ही विनंती करत आहे अमळनेर तहसीलदार खुराणा साहेब यांनी पंचनामे तलाठी यांनी तात्काळ करावे असे विनंती केली आहे. शेतकऱ्याचा कोणी वाली आहे ?का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे दहिवद शेतकरी संदीप भदाणे यांनी झालेल्या नुकसान याची माहिती देताना सांगितले



