⭕ *जागृती मैदान नागरतासला भारतीय लष्करी जवान व अधिकारी यांनी दिली भेट...*⭕

 




    ( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२७ फेब्रुवारी मंगळवार : - वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील नागरतास येथे भारतीय लष्करी जवान व अधिकारी यांनी जागृती मैदान नागरतास  येथे दिनांक 27 फेब्रुवारी. 2024 ला सदिच्छा भेट दिली.थायलंड येथील बौध्द धर्मगुरू भंते खेमसिंग व बौध्दगया येथील भंते अश्वजीत यांचे भारतीय लष्करी जवान यांनी वंदन करुन भंतेजींचे आशिर्वाद घेतले व आमचे जीवन मंगलमय झाल्याची भावना भारतीय लष्करी अधिकारी व जवान यांनी उपस्थित गांवकरी मंडळींच्या समोर व्यक्त केले .उपस्थित भारतीय लष्करी अधिकारी व जवान यांना भीमज्वाला ग्रुप नागरतास तर्फे अल्पोपहार व चहापाणी दिले.तसेच अधिकारी आणि जवान पुण्यावरून पुलगाव कॅम्प जात असताना त्यांना विश्रांतीसाठी खूप चांगले वाटले .मात्र त्यांनी सांगितले कि मैदान आमाला शांत वाटले आणि भगवान बुद्धांची मूर्ती पाहून आम्हाला खूप आनंद वाटला.आणि या मैदान मध्ये थोडी विश्राती घेऊ असे नागरतास च्या उपासक आणि उपासिका यांना सांगितले.तसेच जागृती मैदान नागरतासला भेट दिल्या बद्दल लष्करी जवानांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments