⭕ *दडपशाही आणि घराणेशाहीच्या विरुद्ध लढणाऱ्यांची मुस्कटदाबी : साकिब शाह...* ⭕

 






      ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:बळवंत मनवर )   

             [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]           

 ⭕ यवतमाळ / पुसद ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२९ फेब्रुवारी गुरुवार:- यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसद येथील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ येथे बचत गट मेळाव्यात महिलांना संबोधित करण्यासाठी येणार आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे पुसद शहर अध्यक्ष साकिब शाह यांना वसंत नगर पोलिसांनी स्थानबद्ध ची कारवाई करून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले आहे.लोकांच्या हितासाठी, लोकांच्या हक्क अधिकाराची लढाई लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विरुद्ध पंतप्रधानांच्या सभेच्या निमित्ताने स्थानबद्धतेची कारवाई म्हणजे लोकहितचे कार्य करू नये असाच एक संदेश देण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात आहे. असा आरोप करीत जनहिताची सत्ता यावी या उद्देशाने कार्य करीत असताना दडपशाही आणि घराणेशाहीचा आपल्या आंदोलनातून विरोध केल्यामुळे ही मुस्कटदाबीची कारवाई असल्याची प्रतिक्रिया साकिब शाह यांनी दिली.रस्ता होण्यासाठी आंदोलन करणाऱ्या, हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी लढा उभारणाऱ्या, दिव्यांगाचे हक्क त्यांना मिळून देण्यासाठी लढा लढणारे, भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी पुढे येणाऱ्या, आरोग्य सुविधा मिळावी म्हणून स्वतः रक्तदानातून न्याय मिळवून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता साकिब शाह यांना आज स्थान बद्दल केले आहे.  लोकांचे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांच्या भूमिकेतून लोकसेवा करणाऱ्या यांना सुरक्षेच्या नावावर स्थानबद्ध तेची कारवाई करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न यानिमित्ताने साकिब शहा यांचे मार्फत  विचारले जात आहे.

Post a Comment

0 Comments