( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:३० मंगळवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठी रॅली स्थानिक अशोक नगर प्रभाग तीन मध्ये होणार. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस ३ वेळा रॅली मध्ये होणार तसेच दिनांक ४ ऑगस्ट, रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणार तसेच सर्व बौद्ध उपासक आणी उपासिका यांना सुचीत करण्यात येते की , महाकरुणिक तथागत् संमेक संबुद्ध यांचे महान असे अग्र-श्रावक आणी काही बुद्धांच्या काळातील अर्हंत भंतेजी चे अस्थी कलश यांचे आपल्या मालेगांव नगरी मध्ये आगमन होणार आहे, तरी या अस्थी कलश दर्शन सोहळ्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहून महान असे पुण्य अर्जित करावे.हे अस्थी कलश भंते धम्मा सुगत श्रीलंका वरून नागपूर विमानाने घेऊन जाणार होते पण, भंतेजी ना याचना करुन हा प्रवास मुंबई-मालेगांव-नागपूर रोड ने महाराष्ट्र उपाध्यक्ष धम्मकाया मिशन मनोज सावळे यांनी हा प्रवास ठरवून आपल्याला या महान अस्थी दर्शनाचा लाभ व्हावा, आपणही या पुण्याचे भागीदार व्हावे अशी कामना करुन हा २ तास चा धावता प्रोग्राम आयोजित केला आहे. तसेच सहभागी व्हावे उपासक मनोज सावळे महाराष्ट्र उपाध्यक्ष धम्मकाया मिशन, आणी उपासक राहुल तायडे वाशीम जिल्हा अध्यक्ष धम्मकाया मिशन.मात्र काही महत्त्वाचे नियम अस्थी कलश दर्शन सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड आणी गोंधळ नसावा, शांत वातावरण निर्माण असावे, येतांना कमीतकमी पावकिलो (२५० ग्रॅम) फुले सोबत आणावे, उपासक आणी उपसिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले असावे,अस्थी कलश शोभा यात्रा मालेगांव तहसील ते तहसील पाठी मागे विर भगतसिग चॉक ते तक्षशिला बुद्ध विहार असे असणार आहे, शोभा यात्रा चे स्वरूप या मध्ये भंते व काही उपासक अस्थी कलश घेऊन असतील त्यांच्या पायावर सोबत आणलेले फुले उधाळावी, रस्त्याच्या एक साइड उपासक एक साइड ला उपसिका असतील, विहार मध्ये गेल्या नंतर गाथा /वंदना/अस्थी दर्शन/ देसना करुन पुन्हा नागपूर कडे प्रयाण.

