( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०२ ऑगस्ट शुक्रवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील अवैध धंदे बंद करण्याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय अंभोरे यांनी मालेगाव पोलीस स्टेशन येथे लेखी निवेदन दिले असून निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे शहरातील मागील २ ते ३ महिन्यापासून अनेक अवैध धंदे खुप जोरात चालु आहे. गैर मार्गाने लालसेपोटी पैसे कमविण्याच्या नांदामध्ये मालेगाव शहरामध्ये भरपूर तरुण व विद्यार्थी सुध्दा ह्या अवैध धंद्यांना बळी पडत आहे. इयत्ता १० व १२ मध्ये शैक्षणिक शिक्षण घेत असणारे विद्यार्थी सुध्दा या जुगारामध्ये व सट्यांमध्ये गुंतत आहे.शहरामध्ये मटका, गुटखा, जुगार खुलेआम चालु आहे. त्यामुळे मालेगाव मधील अनेक कुटूंब कर्जबाजारी होऊन उध्दवस्त होत आहे.शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच बस स्टैंड, गांधी चौक, तहसील समोर हॉटेल मध्ये तसेच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुध्दा खुल्याआम सर्वच धंदे सुरु असल्याकारणाने मालेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारीच या सर्व अवैध धंद्यांना मुठमाती देत असल्याचा प्रकार सर्रास दिसून येत असल्याकारणाने मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये अधिकारीच या सर्व अवैध धंद्यांना मुठमाती देत असल्यागचा प्रकार सर्रास दिसून येतआहे मालेगाव शहरातील सर्व अवैध धंदे तात्काळ कायमस्वरुपी बंद करण्यात यावे. अन्यथा मालेगाव पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे.


