*लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात मनसे संघटनेच्यावतिने साजरी...*


( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

 जळगाव  / अमळनेर  ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०१ ऑगस्ट गुरुवार:-जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आण्णाभाऊ साठे याची जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेना संघटनेच्यावतिने अमळनेर येथील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी अमळनेर तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे)तालुका उपाध्यक्ष निलेश चौधरी शहराध्यक्ष धनंजय साळुंखे शहर उपाध्यक्ष करण्यात  पाटील शहर सचिव संकेत पाटील श्यामकांत बडगुजर विभाग अध्यक्ष बापु चौधरी यानी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे याच्या फोटोला पुष्पहार अर्पन करून त्याच्या प्रतिमेच पुजन व त्याच्या चरणी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहून सर्वाना साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.जग बदल घालुनी घाव मला सांगून गेले भीमराव असे अभिमानाने सांगणारे तसेच हि पृथ्वी काल्पनिक शेषाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरी शेतकरी च्या हातानी पेलून धरले आहे. असे परखडपणे बजावणारे आणि रशिया देशात जाऊन तिथे कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाडा गाणारे लोकशाहीर साहित्यसम्राट संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलनातले धगधगते व्यक्तिमत्त्व आदरणीय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फुल पुष्पहार अर्पण करून जयंती साजरा करण्यात आली.तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंखे शहर उपाध्यक्ष करण पाटील तालुका उपाध्यक्ष निलेश चौधरी तालुका उपाध्यक्ष शहर सचिव संकेत पाटील श्यामकांत बडगुजर विभाग अध्यक्ष बापू चौधरी उपस्थित होते*

=========================================













====≈====≈==============≈===============


Post a Comment

0 Comments