( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
वाशिम / रिसोड (लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१२ ऑगस्ट सोमवार :- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील जय श्री महाकालेश्वर मंडळ यांची कावड यात्रा दिनांक १२ ऑगस्ट ला बोरखेडी येथून निघाली असून लोणार सरोवर येथे जाणार आहे .यामध्ये अनेक नवतरुण सहभागी होऊन श्रावण महिन्यात हे महाकालेश्वर कावड मंडळ दरवर्षी अनेक तीर्थक्षेत्रावर तिर्थ आणण्यासाठी जात असते त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा बोरखेडी ते लोणार या पदयात्रेत ही नवतरुण मंडळी बोरखेडी येथून निघाली आहे. जागतिक लोणार सरोवर येथे जाऊन परत बोरखेडी येथे लोणार येथील धारेचे तीर्थ घेऊन परतणार आहे.
