( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०४ ऑगस्ट रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील "व्हॉईस ऑफ मीडिया" च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश प्रतापराव काटे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उर्वरित तालुका कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी गौतम बिऱ्हाडे व सचिव पदी जितेंद्र पाटील यांची तर कोषाध्यक्षपदी रवींद्र मोरे, सहसचिव पदी ईश्वर महाजन व प्रसिद्ध प्रमुखपदी दिनेश पालवे यांची निवड करण्यात आली. उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉ. डिगंबर महाले यांच्या हस्ते नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष उमेश काटे यांच्या सह नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष अजय भामरे आदी उपस्थित होते. उर्वरित कार्यकारिणी अशी...ज्येष्ठ सल्लागारपदी विवेक अहिरराव, उमेश धनराळे व धनंजय सोनार यांची तर कार्यकारणी सदस्य पदी जयंत वानखेडे, बापूराव ठाकरे, मिलिंद पाटील, विनोद कदम, राहुल बहिरम, रजनीकांत पाटील, रवींद्र बोरसे, उमाकांत ठाकूर, कमलेश वानखेडे, मधुसूदन विसावे, सुखदेव ठाकूर, शरद कुलकर्णी, भरत पाटील, प्रकाश जैन, बी एल पाटील, रमण भदाणे, दिनेश नाईक, विशाल मैराळे व प्रसाद जोशी यांची ही निवड करण्यात आली.दरम्यान डिंगबर महाले म्हणाले की, व्हॉईस ऑफ मीडिया ही सकारात्मक पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून असलेली संघटना आहे. एका गावापासून सुरू झालेली ही संघटना आज थेट 41 देशात गेली आहे. राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक एक लाख 76 हजार सदस्य असलेली ही संघटना आहे. या संघटनेचे नाव कसे उज्वल होईल, यादृष्टीने प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. पत्रकारांनी आपली पत्रकारिता सक्षम ठेवण्यासाठी सकारात्मक पत्रकारिता करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. उमेश काटे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, देशातील क्रमांक एक ची पत्रकार संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षपदी माझी नियुक्ती होणे हा क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्याचे पावित्र जोपासण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्वाना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय संघटक अशोक वानखेडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, गुजरात प्रदेश अध्यक्ष जिग्नेश जोशी, उर्दु विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती नदवी, प्रदेश महिला संघटक यास्मिन शेख, गुजरातचे प्रदेश उपाध्यक्ष जिग्नेश जोशी, रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख, आदीनी अभिनंदन केले आहे.
=========================================

















