( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०७ ऑगस्ट बुधवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तंबाखू मुक्त युवा अभियान राबविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी तंबाखूमुक्त युवा अभियान यशस्वी करावे असे आवाहन केले. जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात असताना तरुण व्यसनाधीनतेकडे वळत आहे यामुळे भारताच्या प्रगतीत एक मोठा अडसर निर्माण झाला आहे. तंबाखू, जर्दा, खर्रा, ई हुक्का, सिगारेट,ई सिगारेट, बिडी यामुळे कॅन्सर सारखा गंभीर आजार होत असून तरुण मृत्युमुखी पडत आहे. देशाच्या विकासासाठी तरुणांची फार गरज असून तरुणांनी या व्यसनांपासून लांब राहणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या 2003 च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अशी अंमलबजावणी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, घर, गाव, शाळा ,संस्था, राज्य आणि देश पातळीवर होणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी आपल्या मनोकातून केले. नाजमीन पठाण विद्यार्थ्यांनीने उपस्थित प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाचे आभार कोमल पाटील या विद्यार्थ्यांनीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा व्हि.डी. पाटील,प्रा.डॉ. माधव वाघमारे, प्रा.डॉ. पवन पाटील, प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा.डॉ. संजय महाजन, प्रा. विजय पाटील,श्रीमती मंजुषा गरूड, श्री.सचिन साळुंखे, श्री. शाम पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
