( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दि. ऑगस्ट बुधवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील दि. 6/08/2024 रोजी मालेगाव पंचायत समिती अंतर्गत पीएम मोदी आवाज प्लस घरकुल योजना 2024-25 अंतर्गत अनेक दिवसापासून मालेगाव पंचायत समितीमध्ये निधी उपलब्ध नसल्यामुळे सुरु केलेली काही घरकुले आज रोजी अर्धवट स्तिथीतच आहे कारण काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता तर काहींना दुसरे हप्ते मिळाले परंतु बाकीचे हप्ते थकीत असल्यामुळे लाभार्थीना कर्ज कडून घरे बांधण्याची वेळ आली आहे, अनेक महिन्या पासून मालेगाव पंचायत समिती मध्ये चकरा मारून पण निधी उपलब्ध नसल्याचे ऐकून नागरिकांना आर्थिक. व मानसिक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे... ही बाब प्रशासनाच्या लक्षात यावी म्हणून जावेद धन्नू भवानीवाले, विठ्ठल विषणु भागवत या नागरिकानी मालेगाव पंचायत समितीला राज्य शासनाकडून पि एम मोदी आवास प्लस घरकुल योजनेला लवकरात लवकर निधी प्राप्त व्हा व अर्धवट असलेली घरकुले पूर्ण करता येईल या हेतूने मा. आमदार रिसोड -मालेगाव विधानसभा तथा जिल्हा अध्यक्ष वाशीम काँग्रेस कमिटी यांना पाठपुरवठा करण्या करिता दिले निवेदन.

