( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०९ ऑगस्ट शुक्रवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील बोराळा जहागीर ते संत गजानन महाराज शेगाव पायदळ दिंडी सोहळा गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी बोराळा गावातील सर्व भक्तगणांनी पायदळ दिंडीत जाण्याचा अनेक भक्तांचा उत्साह पाहता दिनांक ५ ऑगस्ट रोजी बोराळा जहाॅगीर येथून अनेक भक्त पायदळ दिंडीत सहभागी झाले. हे दुसरे वर्ष आहे.यामध्ये अनेक महिला, पुरुष व तरुण उत्साही नवतरुण कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले. तसेच गावच्या सरपंचा सौ. पुष्पाताई गजानन जटाळे, गजानन जटाळे, राधेश्याम घायाळ या पायदळ दिंडीचे अध्यक्ष गोपाल घायाळ, शिरपूर ग्रामपंचायतचे सदस्य यादव करणे, नवलाजी पाटील, डॉ. तिरके, नामदेव घायाळ ,अरुण जटाळे ,गणेश पाटील, संजय घायाळ इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक भक्त या दिंडीत संत गजानना चा महिमा गात व भक्ती गीते गात पैदलवारीत भक्त सहभागी झाले. या दरम्यान अनेक अन्नदात्यांनी जेथे-जेथे मुक्काम असेल तेथे अन्नदान केले व सर्वांचे मन तृप्त केले. हे पायदळ दिंडी शेगावला ९ ऑगस्ट रोजी पोहोचणार आहे.
