*आदिवासी दिवस निमित्ताने तुम्ही आम्ही जी ताकद दाखवून दिली या भ्रमास बळी पडु नका.. ती केवळ मिरवणुक व नाचण्या पुरती मर्यादित ठेवु नका...*



( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

 जळगाव / अमळनेर  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दिनांक: ०९ ऑगस्ट शुक्रवार  :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आदिवासी, भिल्ल, मूलनिवासी यांचा आमदार निवडून जाऊ शकतो! 

दारू, मटण पार्ट्यांमध्ये खुश होऊन विभागले जाऊ नका! 

1988 साली मी केले होते भाकीत! पण आपण एकत्र येत नसल्याने होतोय अन्याय! आदिवासी भिल्ल मूलनिवादी बांधवांनी एकी केली व आपल्याला कुणी खुश करून लाडू देतो त्यास न भुलता उमेदवारी केली तर चमत्कार शक्य आहे. आज आदिवादी दिवस निमित्ताने तुम्ही आम्ही जी ताकद दाखवून दिली ती केवळ मिरवणूक व नाचण्या पुरती मर्यादित ठेवू नका.. एकत्र येऊन आपला एकच उमेदवार द्या व फाटाफूट न होऊ देता मतदान करा पुढचा आमदार आपला असेल! 

मी हे 1988 साली बातमी देऊन व पत्रक काढून बोललेलो. आपल्या नेत्याना विविध पक्षाने पाकिटे देऊन व पार्ट्या देऊन गुलाम करुन ठेवले असल्याने आपले काम मार्गी लागत नाही , अमळनेर तालुक्यातील आपली संख्या पाहता हे सहज शक्य आहे. गरज आहे एकत्र येण्याची! 

राग द्वेष विसरून आपला समाज कसा मोठा होईल या साठी त्याग करण्याची! 

मी अमुक गटाचा तालुका अध्यक्ष म्हणून टमुक पुढारी माझा कसा मान ठेवतो यास भ्रमास बळी पडू नका. अमळनेर तालुक्यात आपले नेतृत्व उदयास यावे या प्रामाणिक अपेक्षा!! 

आदिवासी दिवसा निमित्ताने क्रांती पर्व चालू होवो हीच शुभेच्छा-.... 


Post a Comment

0 Comments