( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
वाशिम / रिसोड ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दि: ०७ बुधवार:- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ५०० लोक वस्तीचे गाव वाशिम ते रिसोड राज्यमार्ग ५१ या जोड रस्त्यावर कोयाळी शिरसाट हे गाव आहे या गावातील सामान्य शेतकरी गजानन नारायण शिरसाट यांना तीन मुले असून मदन गजानन शिरसाठ या मुलाची पी.एस. आय. पदी निवड झाली, तर अनिल गजानन शिरसाठ याची चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा उत्तीर्ण केली. आणि लहान मुलगा सुनील गजानन शिरसाट याची यू.पी.एस.सी.ची तयारी चालू आहे अशा सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण हालकीच्या परिस्थितीतून झालेले आहे. मदन व अनिल शिक्षण घेत असतांना कोणत्याही बाहेरच्या हॉटेलमध्ये जेवण केले नाही. स्वतः स्वयंपाक बनवून शिक्षणाकडे लक्ष दिल्याने हे यश संपादन करता आले.या नंतर मदन गजानन शिरसाठ यांना प्रशिक्षणासाठी नाशिक येथे जावे लागेल.या यशाचे श्रेय त्यांचे आई-बाबा यांनाच असल्याचे तीनही मुलांनी बोलतांना सांगितले.या छोट्या गावातील कमी लोकसंख्या असलेल्या गावातील व परिसरातील मंडळींना आनंद झाला व त्यांचे कौतुक करत रिठद येथील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव आरू यांनी दोघांचाही सत्कार केला.यावेळी राधेश्याम शिरसाट व संतोष भिसडे उपस्थित होते.

