( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दि: ०७ बुधवार:- वाशिम जिल्ह्या तालुक्यातील वाघोली बु. या ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबातून आलेल्या प्रशांत नारायण शेळके या तरुणाची PSI पदी निवड झाली. या निवडीबद्दल प्रशांत शेळके यांचा महाराष्ट्र क्रांतिकारी आघाड़ी चे राम इढोळे, व ज्ञानेश्वर इढोळे गजानन इढोळे यांनी सत्कार केला. ग्रामीण भागातील तरुणही प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालू शकतात. ही बाब वाघोली बु येथील शेतकरी कुटुंबातील, घरी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना प्रशांत नारायण शेळके यांनी जिद्द करून दाखविली. त्यांची नुकतीच PSI पदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील युवकही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रचंड मेहनतीने अभ्यास करून अपेक्षीत यश मिळवू शकतात. त्यामुळे प्रशांत नारायण शेळके सारखे युवक हे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असतात. ही बाब हेरून महाराष्ट्र क्रांतिकारी आघाड़ी राम इढोळे व ज्ञानेश्वर इढोळे गजानन इढोळे यांनी प्रशांत शेळके यांचा सत्कार केला.
