( वाशिम जिल्हा शहर प्रतिनिधी :- अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२९ डिसेंबर रविवार :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपावर बंदी घालण्यात यावी असे मत डॉ. अक्षय चंद्रकांत गायकवाड यांनी मत व्यक्त करताना चहा कपाचा वापर नागरिकांनी टाळावा तसेच या कपावर प्रशासनाने बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सविस्तर असे की डॉ. अक्षय चंद्रकांत गायकवाड यांनी बोलताना सांगितले की हॉटेल मध्ये कागदी चहाच्या कपाचा अतिवापर सुरू झाला आहे यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.कागदी कप बनविताना यामध्ये बीएपी नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपांच्या आतील मायक्रो फ्रेंड प्लास्टिक वितळते आणि गरम चहा घेतल्यास लाखो मॅक्रो प्लास्टिकचे कण हे चहाच्या माध्यमातून पोटात जातात त्यामुळे नागरिकांना कॅन्सर सारख्या दूर्धर आजारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांनी चहाच्या कागदी कपाचा वापर टाळावा असे आव्हान डॉक्टर अक्षय चंद्रकांत गायकवाड यांनी केले चहाच्या कपामुळे कॅन्सर सारखे आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कागदी कपावर प्रशासनाने त्वरित बंदी घाला. त्यामुळे कागदी कपावर प्रशासनाने त्वरित बंदी घालावी अशी मागणी डॉ. अक्षय चंद्रकांत गायकवाड यांनी केली आहेत.
=========================================
