⭕ *मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात 'ग्रंथ प्रदर्शन' संपन्न...*🔘

 


 ( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर  ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०१ जानेवारी बुधवार :- जळगाव जिल्ह्यातील  मारवड ता. अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात दिनांक 30/12/2024 पासून दिनांक 31/12/2024 पर्यंत 2 दिवस महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे "ग्रंथ प्रदर्शन" आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत श्रावण देसले यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले.आणि विद्यार्थ्यांना ग्रंथा'विषयी अनमोल मार्गदर्शन केले. प्रा. विजय पाटील ग्रंथपाल यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. 'वाचन-संकल्प'आणि 'वाचन-पंधरवाडा'या उपक्रमात  ग्रंथ प्रदर्शनात विविध ग्रंथ  प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. याचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी घेतला, ग्रंथ-प्रदर्शनास महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद यांनी भेट दिली.

========================================

Post a Comment

0 Comments