( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०७ डिसेंबर शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे शालेय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी शाळेच्या प्रांगणात करण्यात आले. डॉ एल ए पाटील सर नॅनो टेक्नॉलॉजी सायंटिस्ट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यांनी विज्ञान ,शैक्षणिक व सामाजिक या विविध विषयांच्या पैलूंवर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा ॲड ललिता पाटील सचिव प्रा श्याम पाटील संचालक पराग पाटील संचालक प्रा देवेश्री पाटील प्राचार्य डॉ नीरज चव्हाण सर उपस्थित होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचे पर्यवेक्षक म्हणून डी ए धनगर सर व संजय कृष्णा पाटील सर यांनी मोलाची भूमिका बजावली विज्ञान प्रदर्शनात माहिती व तंत्रज्ञान गणितीय सुत्र स्वास्थ आरोग्य नीटनेटकेपणा वाहतूक वातावरणातील घटक नाविन्यता सौर ऊर्जा पवन ऊर्जा पाणी वाचवा प्रदूषण नियंत्रण व शेतीपूरक अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले 200 हून अधिक उपक्रम सादर केले होते. मान्यवर व पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना भेट देत विद्यार्थ्यांकडून उपक्रमाची माहिती घेत आपले अनमोल मार्गदर्शन केले. प्रदर्शनात विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अतिशय सुंदर असे उपक्रम सादर केले व कार्यक्रमाची शोभा वाढवली शाळेच्या उपस्थित विज्ञान शिक्षक व इतर शिक्षकांचे सहकार्य व मार्गदर्शन देखील विद्यार्थ्यांना लाभले विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पालक व विविध स्तरांवरून इतर शाळांचे विद्यार्थी शिक्षक वर्ग व विज्ञान शिक्षक यांनी उपस्थिती लावली. विज्ञान शिक्षक स्वप्नाली धनगर, विशाल सुर्यवंशी, विद्या पाटील, उर्वी शहा, गणेश सातपुते, केदार देशमुख, सागर चावरिया यांनी परिश्रम घेतले. मुस्कान धिंगरे, देवयानी पाटील यांनी सूत्र संचालन तर कार्यक्रमाच्या शेवटी देवयानी पाटील मॅडम व नयना पाटील मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे परीक्षकांचे व उपस्थित यांचे आभार मानले.
========================================
