⭕ *जागतिक एड्स दिनानिमित्त अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपक्रम राबवून केले जनजागृती...*🔘



 ( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०७ डिसेंबर शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील १ डिसेंबर २०२४ जागतिक एड्स दिनानिमित्त *TAKE THE RIGHTS PATH* (मार्ग हक्काचा, सन्मानाचा ) महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत नवीन उद्देशाला गाठून  अमळनेर शहरात आय.सी.टी.सी. व ए.आर.टी विभाग ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले सदर जनजागृती कार्यक्रमात शासकीय रुग्णालय व अमळनेर शहरातील खाजगी रुग्णालय, साने गुरुजी बहुउद्देशीय संस्था लिंक वर्कर प्रकल्प अमळनेर, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील प्रशिक्षणार्थी यांनी देखील जनजागृती मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला डॉ. प्रकाश ताळे ( वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय अमळनेर),API श्री. पाटील (मारवाड पोलीस स्टेशन)अमळनेर शहरातील साई सेवा हॉस्पिटल, डॉ. प्रशांत शिंदे व खैरनार अण्णा, सिद्धकला हॉस्पिटल डॉ. भुषण पाटील व राहुल महाजन, नर्मदा मेडिकल फाउंडेशन डॉ अनिल शिंदे व डॉ संदीप जोशी सुखांजली हॉस्पिटल डॉ. जयेश शिंदे व मनोज सूर्यवंशी , किशोर सूर्यवंशी,लिंक वर्कर दीप्ती पाटील, लिंक वर्कर आरती मोरे, समुपदेशक अश्वमेध पाटील, समुपदेशक दीपक शेलार, समुपदेशक जयेश मोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे, ए आर टी विभाग कर्मचारी रुंद या सर्वांचे मोहीम यशस्वी होण्यासाठी अनमोल असे योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments