⭕ *तालुक्यातील १४ विविध शाळांना दातृत्व दाखवून नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे याच्या विकास निधीतून शाळांना यावेळी संगणक संच व पोडिअम भेट वस्तु देण्यात आल्या...*🔘

 


(अमळनेर शहर मानद प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१२ डिसेंबर गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून अमळनेर तालुक्यातील १४ शाळांना संगणक व पोडीअम वाटप करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष,माजी संचालक जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पतपेढी तसेच मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस एन पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहनराव सुपेकर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुषार बोरसे उपस्थित होते. एस एन पाटील यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करतांना सध्याच्या जगात अद्यावत साहित्य शाळांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.त्यावरून त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. माजी आमदार सुधीर तांबे व विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांचे सदैव दातृत्व मतदारसंघात राहिलेले आहे. त्यामुळेच त्यांनी तालुक्यातील विविध शाळांना दातृत्व दाखवून संगणक संच व पोडिअम भेट दिले आहेत.यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापक एस, व्हि पाटील,मनोज पाटील,निलेश विसपुते, दिपक पवार,हर्षल पाटील, शेख मुस्ताक आदी उपस्थित होते. यावेळी  माध्यमिक विद्यालय लोण ग्रुप, कै,भालेराव रामभाऊ पाटील सायन्स,आर्ट,कॉमर्स  जुनिअर कॉलेज मारवाड , सु,आ पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे, किशन दाजी हायस्कूल सावखेडा, एस एस पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे,योगेश्वर माध्यमिक विद्यालय डांगर ,इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय अमळनेर, केडी गायकवाड माध्यमिक विद्यालय अमळनेर ,माध्यमिक विद्यालय नगाव बुद्रुक, जि प शाळा हेडावे, माध्यमिक विद्यालय टाकरखेडा, जि प शाळा आमोदे, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, खुशाल बापू माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा गडखांब आदी शाळांना यावेळी भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी केले. यावेळी प्राध्यापक शेख तुषार बोरसे, सुशील भदाणे यांची मनोगते झाली.या वेळी सोहल शेख, प्राचार्य  शकील जलालुद्दीन शेख,  संजय पाटील यांच्या सह आदी शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=========================================

Post a Comment

0 Comments