⭕ *कै अँड मनोहर भांडारकर यांची सानेगुरुजी वाचनालयात शोक सभा...*🔘

 


  ( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१६ डिसेंबर सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयातील माजी अध्यक्ष अँड मनोहर भंडारकर हे वाचनालयात 1989 ते 1993 या कालावधीत अध्यक्ष होते. नुकतेच त्यांचे 90 व्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनामुळे परीवाराला एक धक्का बसला.. एक वाचन प्रेमी यांनी वाचन संस्कृतीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य घालवले वाचनालयामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. अँड मनोहर भंडारकर यांच्या शोक सभेचे आयोजन करण्यात आले.पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे यांनी शोक सभा प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक स्तरावर त्यांचे योगदान होते. साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष ,विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष, अमळनेर वकील संघाचे चिटणीस, म.वा मंडळाचे कोषाध्यक्ष, अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष शनी मंदिर न्यासाचे विश्वस्त ,प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राचे सदस्य, रोटरी क्लबमध्ये देखील सक्रिय होते.. ग्राहक पंचायत चे ते अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी चोखपणे सांभाळल्या होत्या.. प्रताप कॉलेजच्या मराठीच्या वरिष्ठ निवृत्त प्राध्यापिका डॉ. माधुरीताई भांडारकर यांचे ते पती होते.. एडवोकेट अण्णासाहेब मनोहर भांडारकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले सुना नातू असा परिवार आहे.ते पाडळसरे धरण संघर्ष समितीचे समन्वयक हेमंत भांडारकर यांचे ते वडील होते असे त्यांनी सांगितले.. यावेळी साने गुरुजी वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव, संयुक्तचिटणीस सुमित धाडकर, एडवोकेट रामकृष्ण उपासनी,ईश्वर महाजन, , प्रसाद जोशी,दिपक वाल्हे स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार सह वाचनालयाचे कर्मचारी मधुकर बाळापुरे,रमेश सोनार यांची उपस्थिती होती..

========================================

Post a Comment

0 Comments