( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१३ डिसेंबर शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्याच्या प्रयत्न करण्याऱ्याला दोषींवर कारवाई करावी आणि पोलिस प्रशासना कडून राबविण्यात येणारे कोबिंग ऑपरेशन तत्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी आज अमळनेर शहरात सर्व समाज बांधवाच्या वतीने प्रांताधिकार्यना निवेदन देण्यात आले.ह्या वेळी निवेदनात असे म्हंटले आहे की दि.१०/१२/२०२४ रोजी परभणी येथे आपल्या समस्त भारतीय नागरिकांची आणि आंबेडकरी व बौद्ध समाज बांधवाची तसेच संविधान प्रेमीचीही अस्मिता असलेल्या आपल्या भारतीय संविधान या राष्ट्रीय ग्रंथाचा अवमान करणाऱ्या अतिशय घाणेरड्या मनोविकृतीचा मानसिकतेचा आम्ही समस्त अमळनेरचे दक्ष व जागरूक नागरिक अत्यंत तीव्र निषेध करतो व दोषीवर कठोर कारवाई करून देशद्रोह्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे. असे ह्या निवेदनात म्हंटले आहे ह्या वेळी विशाल सोनवणे, गौतम बि-हाडे, बाळासाहेब संदानशिव, अर्जुन संदानशिव, राहुल बि-हाडे,मनोज शिंगाने, गौरव सोनवणे,नवीन शेख,समाधान बि-हाडे, सोनू बि-हाडे,दर्शन बि-हाडे, अक्षय सोनवणे, अजय बि-हाडे,सागर पाटील,अनिकेत बि-हाडे,ओम बि-हाडे, भूपेंद्र शिरसाठ,पवन बि-हाडे यांचा सह सर्व युवक आणि सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.
========================================
