( अमळनेर तालुका प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१० जानेवारी शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प अंतर्गत शासकीय उपसा सिंचन योजना क्रमांक ३ व ४ चा भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. सप्तशृंगी माता मंदिरासमोर गांधली रोड येथे या योजनेचे भूमिपूजन जळगाव लोकसभा खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यांनी सांगितले की अमळनेर शहरासाठी हा एक ऐतिहासिक पाडळसे धरण संजीवनी शेतकऱ्यांसाठी एक मोठे गती मिळेल शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे व फायदा आहे शेतकरी यांनी त्याचा परिपूर्ण फायदा घेऊन आपल्या शेतीला पुरेल एवढा पाणी आपल्याला मिळेल या उपसा सिंचन योजनेचा लाभ अमळनेर मतदारसंघातील नागरिकांना लवकरच मिळावा, यासाठी हा भूमिपूजन सोहळा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या सोहळ्यामुळे प्रकल्पाच्या कामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.यावेळी अमळनेर मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, व लोकप्रतिनिधी, आजी माजी सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, सह बाजार समिती संचालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होऊन सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित केले! कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते...
========================================

