⭕ *खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थतीमध्ये गांधली येथे 'संविधान अमृत महोत्सव पर्व' जागर...*🔘

 

 ( अमळनेर तालुका प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१० जानेवारी शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर गांधली येथे संपन्न होत आहे.या शिबिरास खासदार स्मिताताई वाघ यांनी भेट देऊन, भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव पर्व साजरी करण्यात सहभाग घेतला याप्रसंगी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार ताईंचे हस्ते करण्यात आले.उपस्थित सर्व शिबिरार्थीना संबोधित करताना खासदार स्मिता वाघ यांनी आपल्यासाठी संविधान हे अतिशय पवित्र आहे आणि राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमातून प्रेरणा घेऊन संसदेपर्यंत  माझं स्वतःचे नेतृत्व तयार करण्यात योगदान मिळाले आहे .म्हणून विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये सक्रिय कामकाज करून स्वतःचा विकास करावा असे आवाहन केले .यावेळी हिरालाल पाटील, चेतन पाटील, स्वप्नील पाटील यांची उपस्थिती होती.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विजयकुमार वाघमारे, डॉ. अनिता खेडकर, प्रा डी आर ढगे, डॉ सागर राज चव्हाण यांनी महाविद्यालयातर्फे स्वागत केले. सुत्रसंचलन रासेयो स्वयंसेवक सागर कोळी यांनी केले तर आभार डॉ.अनिता खेडकर यांनी मानले.

========================================

Post a Comment

0 Comments